खोपोली ः प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील बीड खुर्द येथे प्रथमच भाजपच्या वतीने कलोते पंचायत समिती विभाग शक्तिप्रमुख लवेश कर्णूक यांच्या संकल्पनेतून चार दिवसीय क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जांबरूंग संघाने विजेतेपद पटकावून भाजप चषक जिंकला.
श्री गणेश क्रिकेट मित्र मंडळ, ओम साईराज मित्र मंडळ, जय महालक्ष्मी सेवा संस्था, अष्टविनायक मित्र मंडळ, संतबाबा विष्णूदत्त मित्र मंडळ यांच्या सहकार्याने ही स्पर्धा बीड खुर्द येथील प्रभाकर कर्णूक यांच्या मैदानात झाली. या वेळी भाजप खालापूर तालुका युवक अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना ग्रामीण भागातील खेळाडूंना अशाच प्रकारे प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
स्पर्धेत द्वितीय क्रमांक बीड खुर्द संघाने, तृतीय नंदनपाडा संघाने व चतुर्थ लौजी संघाने मिळविला. त्यांना चषक व रोख रकमेचे बक्षीस देण्यात आले. मालिकावीर ऋषिकेश कर्णूक (बीड खुर्द), उकृष्ट फलंदाज कुणाल पाटील (लौजी), तर उकृष्ट गोलंदाज रोहन कांबळे (जांबरूंग) ठरला. त्यांनाही गौरविण्यात आले.
भाजप महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील, भाजप जिल्हा चिटणीस शरद कदम, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जगदिश आगिवले, तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील, बीड खुर्द सदस्य प्रणाली बडेकर, महिला सरचिटणीस स्नेहल सावंत, अनिल कर्णूक यांच्यासह कार्यकर्ते व क्रिकेटप्रेमी या ठिकाणी उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा
पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …
RamPrahar – The Panvel Daily Paper