उरण : वार्ताहर
शरीराचे अंतर बाह्य भाग निरोगी ठेवण्यासठी व्यायाम, योगासने, प्राणायाम, ज्ञानधारणा करणे महत्वाचे आहे. रविवारी (दि. 21) आंतरराष्ट्रीय योग दिन उरण तालुक्यात साजरा करण्यात आला. प्रत्येकाने आपल्या घरात सोशल डिस्टन्सिंग ठेऊन योगासने केली.
उरण तालुक्यातील नागाव मांडन आळी येथे सोशल डिस्टन्सिंग ठेऊन ठेऊन योग प्रशिक्षक तथा योगाचार्य दिनेश घरत यांनी विविध आसने, प्राणायाम व विविध योगातील प्रात्यक्षिके करून दाखविली सुमारे 15 व्यक्तींनी या शिबिराचा लाभ घेतला. त्यात सूर्य नमस्कार, मकरा आसन, भुजंगा आसन, नौका आसन, धनुरा आसन, मर्कटा आसन, पवन मुक्त आसन, कपाळ भाती, अनुलोम -मिलोम, भात्रिका आसन, भ्रामरी, उज्जाय प्राणायाम, उद्गीत (ओमकार) प्राणायाम, मुद्रा प्राणायाम, कनिष्ठा, मध्यमा, जेष्ठा, चीन मुद्रा, शवासन आदी आसणे व प्राणायामचे प्रतीशिके दाखविले.
योगासने नियमित केल्याने विविध फायदे होतात त्यात हृदयाला ऑक्सिजन पुरवठा मोठ्या प्रमाणात होतो. फुफुस, हृदय, मजबूत होते. मेंदूला रक्त पुरवठा चांगला होऊन मेंदू सक्षम होतो. रक्त शुद्ध होते. वजन कमी होते. रक्तातील पांढर्या पेशी मजबूत होतात. शरीरातील रोग प्रतिकार शक्ती वाढते. कोरोना सारख्या रोगापासून बचाव होतो. आपल्या शरीरातील दुषित घटक बाहेर पडतात, असे विविध फायदे होतात. सन 2003 पासून आजपर्यंत मोफत सहा योगा शिबिर घेऊन सुमारे 10 हजार लोकांना शिकविले आहेत, असे योग प्रशिक्षक तथा योगाचार्य दिनेश घरत यांनी सांगितले.