Breaking News

राज्य शासन सतत निर्णय बदलते त्यामुळे नुकसानभरपाईस विलंब

आमदार अमित साटम यांची टीका

म्हसळा : प्रतिनिधी

3 जून रोजी झालेले निसर्ग चक्रीवादळ थांबून कोकणी माणूस शेतात पोहचला तरी, सत्ताधारी नुकसानभरपाई बाबत सतत निर्णय बदलत आहे हे चुकीचे आहे. सत्तारुठ पक्ष गरजूंना मदत देण्यामागे दुजाभाव करत आहे. श्रीवर्धन म्हसळ्यात शासनाचे धोरण पारदर्शकपणे राबविले जात नाही हे चुकीचे असल्याचे स्पष्ट मत भाजपचे आमदार अमित साटम यांनी म्हसळा तालुक्याचा आढावा घेताना सांगितले.

भाजपचे आमदार अमित साटम ह्यांनी निसर्ग चक्रीवादळाचे पार्श्वभूमीवर तालुक्यातील म्हसळा बेलदार वाडी, केल्टे, मेंदडी, खरसई व चिखलप या गावांमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. या वेळी अनेक आदग्रस्तानी शासन व सत्तारूठ पक्ष पंचनाम्यात दुजाभाव करते अशा तक्रारी केल्या.

या वेळी त्यांच्या समवेता त्यांचा सोबत भाजप राज्य परिषद सदस्य संजय कोनकर, श्रीवर्धन मतदार संघ अध्यक्ष कृष्णा कोबनाक, म्हसळा तालुका अध्यक्ष प्रकाश रायकर, अल्पसंख्याक अध्यक्ष समीर धनसे, तालुका सरचिटणीस महेश पाटील, मेंदडी गण अध्यक्ष अनिल टिंगरे, पाभरे गण अध्यक्ष सुनील टिंगरे, शहर अध्यक्ष मंगेश मुंढे यांच्या सहित भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार साटम यांनी तहसीलदार शरद गोसावी यांच्याकडे मदत देण्यास सत्ताधारी पक्षातील नेते गरिबांसाठी आलेले धान्य दादागिरी करून एक तर स्वतचा घरी ठेवतात नाहीतर हेच धान्य वाटण्यात पक्षपात करून गरिबांच्या धान्यावर सत्ताधारी डल्ला मारत असल्याचा आरोप करून राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. निसर्ग चक्री वादळामुळे ज्यांचे घर पडलेले आहेत अथवा ज्या घरांना नुकसान झालेला आहे, त्या झालेल्या नुकसानीचे शासनाकडून 100% पंचनामे करण्यात आले होते. मात्र रातोरात महाविकास आघाडीने पंचांनाम्याचे निकष बदलण्याचा जी. आर काढला आहे. पुन्हा पंचनामे करण्याचा नावाने मदतीच्या प्रतीक्षेत असणार्‍या नुकसान ग्रस्थांची थट्टा शासन करीत आहे, असा आरोप आमदार साटम यांनी केला.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply