पोलादपूर : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीपूर्वीच श्रीवर्धन, मुरुड, माणगाव या तिन्ही ठिकाणी सर्वेक्षणात्मक बैठका झाल्या होत्या. वादळानंतर दोन-तीन तासानंतर स्थानिक संघ स्वयंसेवक एकत्र आले व मदतकार्याची दिशा ठरवली. श्रीवर्धन या तालुक्याच्या ठिकाणी रवींद्र राऊत हायस्कूल येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीचे मदत केंद्र कार्यान्वित झाले. तहसीलदार, नगरपरिषद आयुक्त यांच्याशी समन्वय ठेवून कामाला सुरुवात झाली. वादळामुळे श्रीवर्धनमधील प्रत्येकाच्या बागायतीचे प्रचंड नुकसान झाले. लोकांना वहिवाट करता येईल, एवढी साफसफाई, वृक्षतोड स्वयंसेवकांनी केली. सरायगड जिल्ह्यातील सर्व भागातील स्वयंसेवकांनी आळीपाळीने श्रमदान केले. श्रीवर्धनप्रमाणेच जिल्ह्यातील रोहा, तळा, माणगाव याबाधित तालुक्यात पत्रा वाटपाचे व अन्य मदत कार्य चालू आहे. यापुढेही विविध प्रकारे पीडित रायगड जिल्ह्यातील समाजघटकांसाठी सेवाकार्य करण्याचे नियोजन आहे.