तिघांचा मृत्यू; 47 कोरोनामुक्त
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यात शुक्रवारी (दि. 26) कोरोनाचे 116 नवीन रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे तर 47 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महापालिका हद्दीत 87 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 36 रूग्ण बरे झाले आहेत. पनवेल ग्रामीणमध्ये 29 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. 11 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल सेक्टर 4 मधील पुष्पांजली अपार्टमेंट मधील 66 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर रुग्णांमध्ये कळंबोलीत 16, कामोठे 11, खारघर 19, नवीन पनवेलमध्ये 14, पनवेलमध्ये 24, तळोजामध्ये तीन अशी रुग्णाची संख्या आहे.
पनवेल ग्रामीण भागात नेरे येथील 35 वर्षीय व्यक्ती आणि विचुंबे येथील 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. नव्याने भर पडलेल्या रुग्णांमध्ये नेरे नऊ, विचुंबे पाच, आदई चार, उलवे चार, कोन, आजीवली, वाकडी, करंजाडे, बारापाडा, केळवणे आणि उसरली खुर्द मध्ये प्रत्येकी एक रुग्ण असा समावेश आहे. विचुंबे, उसर्ली खुर्द, उलवे येथे प्रत्येकी दोन, बेलपाडा, पळस्पे, नेरे, देवद, नेवाळी येथे प्रत्येकी एक रुग्ण बरे झाले आहेत.
नवी मुंबईत 224 नवे कोरोनाबाधित
नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबईत शुक्रवारी 224 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर 106 जण कोरोनामुक्त झाले. नवी मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच हजार 853 झाली असून लवकरच सहा हजारांचा टप्पा ओलांडणार आहे. तर बरे होऊन परतलेल्यांची एकूण संख्या तीन हजार 294 झाली आहे.
दिवसभरात पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत नवी मुंबईत दोन हजार 365 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. बेलापूर 28, नेरुळ 38, वाशी 19, तुर्भे 12, कोपरखैरणे 30, घणसोली 27, ऐरोली 54, दिघा 16 अशी आकडेवारी आहे.
पेण तालुक्यात 16 जणांना कोरोना
पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील शुक्रवारी 16 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांमध्ये बेणसमध्ये तीन स्त्री दोन पुरुष, तांबडशेतमध्ये एक पुरुष, रोहिदास नगर तीन स्त्रिया, दोन पुरुष, हनुमान आळी दोन स्त्रिया, सागर सोसायटी दोन स्त्रिया, चिंचपाडा एक स्त्री यांचा समावेश असुन पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 41 झाली आहे. यामुळे आतापर्यंत 86 रुग्ण कोरोना आजाराने बाधित होते. त्यातील 44 रुग्ण बरे झाले आहेत. व एकाच मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात सहा जण पॉझिटिव्ह
उरण : वार्ताहर
उरण तालुक्यात शुक्रवारी सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यात नवीनशेवा येथील 35 वर्षीय पुरुष, कोटनाका येथील 17 वर्षीय महिला, बोकडविरा येथील 43 वर्षीय पुरुष, म्हातवली येथील 52 वर्षीय पुरुष, देऊळवाडी येथील 38 वर्षीय महिला, कामठारोड येथील 26 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. तसेच कोप्रोली येथील होम क्वारंटाइन असलेल्या 24 वर्षीय महिलेला डिस्चार्ज दिला आहे. एकुण रुग्ण संख्या 236 आहे.