Breaking News

कोरोनाग्रस्ताचे रुग्णालयातून पलायन; पोलिसांकडून शोध सुरू

पनवेल : वार्ताहर

कोरोना बाधित रूग्णांच्या संसर्गामुळे इतरांना कोरोनाची लागण होत असल्याची माहिती असताना देखील पनवेल भागात राहणार्‍या एका 32 वर्षीय कोरोना बाधित तरूणाने कामोठे येथील एमजीएम रूग्णालयातून कोणाला काही एक न सांगता पलायन केल्याची घटना घडली आहे. रूग्णालयातून पळून गेलेल्या या कोरोना बाधित रूग्णामुळे इतरांना कोरोनाची लागण होऊन त्यांच्या जीवास धोका होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी या रूग्णाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अद्याप पोलिसांच्या हाती न आल्याने अखेर पोलिसांनी या रूग्णाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत पळून गेलेला कोरोना बाधित रूग्ण पनवेलच्या चिंचपाडा गावात राहणारा असून त्याला कोरोनाची लागण झाल्याचे निदात 27 जून रोजी सायंकाळी कामोठे येथील एमजीएम रूग्णालयात चौथ्या मजल्यावरील कोव्हीड वार्डमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या रुग्णाने संधी साधून तेथील पलायन केले. यासंदर्भात सर्वत्र शोधाशोध करून सुद्धा तो न आढळल्याने या रूग्णाविरोधात कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply