विविध पक्षांतील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
चौक : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेतील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 22) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. हा पक्षप्रवेश सोहळा चौक येथील पोतदार सभागृहात सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या उपस्थितीत झाला.
या कार्यक्रमास माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, विनोद साबळे, रामदास ठोंबरे, पंकज शहा, लक्ष्मण पाटील, गणेश मुकादम, गणेश कदम, नंदू सोनावणे, ज्ञानेश्वर सुर्वे आदी उपस्थित होते.
या वेळी विविध पक्षांतील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांचे आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप नेते महेश बालदी यांनी स्वागत केले. आपल्या भाषणात त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागण्याचे सूचित केले. या कार्यक्रमात भाजपतील अनेक कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली.