Breaking News

रसायनी परिसरात कडकडीत बंद

मोहोपाडा : प्रतिनिधी

रसायनी परिसरातील वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या दहा दिवसांपासून वाढत चाचला आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. परिसरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी वासांबे मोहोपाडा, चांभार्ली व वावेघर ग्रामपंचायतीकडून चार दिवस परीसरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आल्या आहेत. वासांबे (मोहोपाडा) ग्रामपंचायत हद्दीत 41 कोरोनारुग्णांची संख्या झाली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. यासाठी वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायत, व्यापारी असोसिएशन व सर्वपक्षीय कार्यकर्ते यांच्यात बैठक होवून 2 ते 5 जुलै जनता कर्फ्यु पालन करण्याचे ठरले. याला परीसरातील चांभार्ली व वावेघर ग्रामपंचायतीने पाठिंबा देवून जनता कर्फ्यु पालन केला आहे. दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच परीसरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट जाणवत होता. परीसरात डॉक्टर मेडिकल व दुध सेवा वगलता सर्व बाजारपेठ व इतर सेवा बंद होत्या.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply