प्रभाग 17मधील शेकापच्या कार्यकर्त्यांचा भाजपत प्रवेश
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17मधील शेतकरी कामगार पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये शुक्रवारी जहीर पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला लागलेली गळती ग्रामीण भागासह शहरी भागातही सुरू आहे. या सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले. पालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मधील शेतकरी कामगार पक्षाचे विकी शेलार, सुनील शेलार, विनायक माणिक, हरिश माणिक, अजीम काझी, इरफान काझी, दानिश शेख, महेबूब पठाण, अनवर उल-हक, अलतमरा शेख, शाहिद खान, तोसीफ खान, अजय खैरे, ययाती सुपेकर, पुरुषोत्तम सुपेकर यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, अतुल पाटील, एकनाथ भोपी, पांडुरंगशेठ केणी, बाबा नाईक, संजय भगत, मयुरेश खिस्मतराव, आदित्य डिंगोरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.
शेकापच्या मनमानीला कंटाळून पिसार्वे, खुटातील कार्यकर्ते दाखल
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेशाचा ओघ सातत्याने सुरूच आहे. त्याअंतर्गत शेतकरी कामगार पक्षाच्या मनमानी कारभाराला कंटाळून पिसार्वे आणि खुटारी येथील शेकापच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत केले.पनवेल तालुक्यातील शेतकरी कामगार पक्षाचे पिसार्वे येथील कैलास दवणे, किशोर दवणे, विनोद दवणे, अविनाश दवणे, तकदीर दवणे, गोमा म्हात्रे, रमन म्हात्रे, रोहिदास म्हात्रे यांच्यासह अनेकांनी जाहीर पक्षप्रवेश केला, तसेच खुटारी येथे शेकापचे रोहिंजण ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विलास म्हात्रे, अशोक म्हात्रे, संतोष म्हात्रे, दिलीप म्हात्रे, पंकज म्हात्रे, जीवन म्हात्रे, जगदिश म्हात्रे यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, प्रभाग क्रमांक 1चे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे, पनवेल महापालिका युवा मोर्चा चिटणीस नेहाल ठाकूर, प्रभाग क्रमांक 1चे सोशल मीडिया संयोजक रामचंद्र शेलार, रानेश महादे, आविक महादे, संजय म्हात्रे, मनोहर कदम, हरिश्चंद्र म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कानपोली, वलपमध्येही शेकापला भगदाड
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल विधानसभेचे भाजप, शिवसेना आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांचा जोरदार प्रचार सुरू आहे. या प्रचाराच्या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन कानपोली आणि वलप येथील शेकाप, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. सर्व प्रवेशकर्त्यांचे महापौर डॉ. कविता चौतमोल आणि महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत यांनी पक्षात स्वागत केले. पनवेल विधानसभेचे भाजप, शिवसेना, आरपीआय आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारार्थ कानपोली आणि वलप येथील आयोजित रॅलीमध्ये झालेल्या या पक्षप्रवेशाच्या वेळी शेकापचे संतोष भोईर, गजानन भोईर आणि काँग्रेसचे धोंडू खाडेकर, सोपान खाडेकर, प्रकाश खाडेकर, संजय पाटील यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या वेळी तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, दशरथ म्हात्रे, प्रभाकर जोशी, वासुदेव घरत, नंदू पाटील, विनोद घरत, कृष्णा पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.