Breaking News

कर्जत तालुक्यात गावठी हातभट्टीच्या विरोधात कारवाई

कडाव : वार्ताहर : गावठी हातभट्टी दारूच्या विरोधात कर्जत पोलिसांनी मोहीम उघडली असून,  तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील कळंबोली गावामध्ये गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकून तो उद्ध्वस्त करून टाकला.

हातभट्टीची दारू बनविण्यात येत असल्याची खबर तेथील स्थानिक आदिवासी महिलांनी कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक सुजाता तानवडे यांना प्रत्यक्षात भेट घेऊन दिली. त्यानंतर तानवडे यांनी आपल्या टीमच्या साह्याने सापळा रचून हातभट्टी उद्ध्वस्त करत 35 हजारांचा माल नष्ट केला, मात्र अवैध दारू बनविणारे अज्ञात पसार झाले असून त्यांना लवकरच पकडले जाईल, असे श्रीमती तानवडे यांच्याकडून सांगण्यात आले आहे, तर  स्थानिक आदिवासी महिलांच्या या धाडसी निर्णयाचे कौतुक करत तानवडे यांनी मी तुमच्याबरोबर आहे, असे सांगत या महिलांचे मनोधैर्य वाढवले आहे.

पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे यांना कळंबोली येथील आदिवासी वाडीतील महिलांनी एकत्र येत आमच्या गावाच्या साईटला असणार्‍या वन विभागाच्या क्षेत्रातून बारामही वाहणार्‍या पेज नदी किनारी गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यात येत आहे, असे सांगण्यात आले. एवढ्यावरच न थांबता त्यांनी आमच्या येथील दारूभट्ट्यांवर कडक कारवाई आपल्याकडून व्हावी, तसेच असे कृत्य पुन्हा करण्याची कुणाची हिंमत होता कामा नये असे त्या आदिवासी महिलांनी चर्चा करत पोलीस प्रशासनाचा मदतीचा हात मागितला. त्यानंतर मात्र  तानवडे यांनी सूत्रे हालवत पोलीस उपनिरीक्षक सचिन गावडे यांच्याबरोबर पोलीस हवालदार प्रवीण लोखंडे, सचिन नरुटे, पो. शि. गजानन केंद्रे, वाकोजी कोलमकर, गणेश पाटील, शशिकांत देशमुख, अश्रुबा बेंद्रे यांच्या टीमने घटनास्थळी धडक देत धाड टाकली. त्यामध्ये तेथे नदीकिनारी लपविलेल्या साधनांचा शोध घेतला असता त्या वेळी 20 प्लॅस्टिकच्या टाक्या व 50 लिटर क्षमतेचे ड्रम आढळले असून त्यामध्ये  सुमारे एक हजार लिटर रसायन आदी साहित्य मिळाले. याची किंमत सुमारे 35 हजारांच्या आसपास असून पोलिसांनी तो मुद्देमाल जागीच नष्ट केला आहे.

Check Also

विधायक कार्यासाठी शिक्षकांच्या पाठीशी -आमदार प्रशांत ठाकूर

शिक्षक संघाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पनवेल : रामप्रहर वृत्तअखिल भारतीय प्राथमिक संघ पनवेल शाखेचा …

Leave a Reply