Breaking News

रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती

खारघर : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयात सोमवारी (दि. 6) वार्षिक स्नेहसंमेलन रंगले. या वेळी बोलताना संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या विद्यालयाचा प्रगतीचा आलेख क्षितीजाच्या पलीकडे गेला आहे, असे गौरवोद्ार काढले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मुंबई विभागीय सचिव ज्योत्स्ना शिंदे-पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्याचबरोबर संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सदस्य तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, सचिव डॉ. एस.टी. गडदे, संचालक संजय भगत, माजी नगरसेविका अनिता पाटील, भाजपचे जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष किरण पाटील, स्कूल कमिटी मेंबर प्रभाकर जोशी, प्राचार्य निशा नायर, ओवेपेठ येथील रामशेठ ठाकूर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष खांदेकर, सहाय्यक शिक्षिका नमिता आखुरी, खुशबू भोसले, सहाय्यक शिक्षक नंदकुमार भोईर यांच्यासह आदी उपस्थित होते.
या वेळी ’क्षितिज-एक नये संकल्प के साथ’ या थीम अंतर्गत विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी त्यांचे नृत्याविष्कार सादर केले. सांस्कृतिक कार्यक्रमांचेही सादरीकरण झाले. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.

Check Also

आमदार आपल्या दारी उपक्रमाचे तळोजात नागरिकांकडून स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्ततळोजा फेज 1मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार आमदार आपल्या दारी हा …

Leave a Reply