Breaking News

पनवेलमध्ये भाजपचा प्रवेशोत्सव; देवद, पनवेल येथे पक्षप्रवेश

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करणार्‍यांचा ओघ कायम आहे. त्याअंतर्गत देवद आणि पनवेलमधील शेकापच्या अनेक पदाधिकार्‍यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केल्याने भाजपची ताकद आणखीणच वाढली आहे. हा पक्षप्रवेश सोहळा भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 1) झाला. भाजपच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेशाच्या वेळी देवद ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या तेजस्विनी वाघमारे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या करुणा वाघमारे, सदस्या अर्चना वाघमारे, ललिता गायकर, नीलेश गायकर, वासुदेव वाघमारे, शिवशक्ती महिला मंडळाच्या पदाधिकारी, तसेच पनवेल शहरातील शेकापचे युवा नेते मयुरेश खिस्मतराव, गणेश मंजुळे, शेखर मंजुळे, प्रतिक माळी, दिनेश चौधरी, प्रतिक चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला असून, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, पनवेल महापलिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, महिला मोर्चा तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, भाजप नेते एकनाथ भोपी, नगरसेविका दर्शना भोईर, अमित पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी नेरे जिल्हा परिषद युवा मोर्चा अध्यक्षपदी साहर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply