Friday , March 24 2023
Breaking News

पोलादपूर तालुक्यात शिवसेनेचा प्रचाराचा धडाका

पोलादपूर : प्रतिनिधी : तालुक्यातील जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य चंद्रकांत कळंबे यांची नाराजी दूर करण्यात आ. भरत गोगावले यांना यश आले असून राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या उपस्थितीत ना. गीते यांच्या प्रचाराची धुळवड उडविण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोलादपूर शहरातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आ. भरत गोगावले यांच्यासोबत जि. प. सदस्य चंद्रकांत कळंबे, पंचायत समितीचे सदस्य यशवंत कासार, तालुकाप्रमुख नीलेश अहिरे, पोलादपूर नगरपंचायतीचे बांधकाम सभापती नागेश पवार, तसेच विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, अनिल मालुसरे, अनिल दळवी आदींनी अभिवादन केले. तालुक्यातील कापडे बुद्रुक, बोरज, कणगुले, साखर, देवळे या ठिकाणी जाऊन आ. गोगावले यांनी शिवभक्तांना शिवरायांच्या थोरवीची आठवण करून देत प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. या वेळी उमेश कालेकर, वनिता तुर्डे, रमेश तुर्डे, तसेच अन्य शिवसैनिक उपस्थित होते.

साखर येथे माजी सरपंचांचा प्रवेश आमदार गोगावले यांचे साखर येथे शिवजयंती उत्सवावेळी फटाक्यांच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले.  या वेळी पांडुरंग मालुसरे, गणेश मालुसरे, लक्ष्मण मालुसरे, राजेश मालुसरे, जितेंद्र मालुसरे, नितेश मालुसरे, भावेश मालुसरे, सतीश मालुसरे, विशाल मालुसरे, संतोष मालुसरे, संदीप मालुसरे यांच्या समवेत असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, नगरसेवक नागेश पवार, विभागप्रमुख लक्ष्मण मोरे, अनिल मालुसरे, अनिल दळवी, सचिन कदम, रवींद्र मालुसरे, दीपेश मालुसरे आणि तालुक्यातील शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे आणि तालुका प्रमुख नीलेश अहिरे यांनी प्रवेशकर्त्यांच्या खांद्यावर भगवी पताका देऊन त्यांचे शिवसेनेमध्ये स्वागत केले.

या सर्व प्रवेशकर्त्यांनी शिवसेनेचे आ. भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनंत गीते यांना भरघोस मताधिक्य देण्याचा निर्धार केला.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रामधील नागरिकांना एकूण करात दिलासा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांनी सभागृहाचे वेधले लक्ष; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply