Breaking News

श्रीसदस्यांच्या स्वच्छता अभियानाने स्मशानभूमी झाल्या चकाचक

जिल्ह्यात अनोख उपक्रम, सर्वस्तरातून कौतुक

कर्जत : बातमीदार : कर्जत तालुक्यातील श्रीसदस्यांनी हवामान दिनाचे औचित्य साधून डॉ. श्री आप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण कर्जत तालुक्यात स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबविले. यात सुमारे 170 स्मशानभूमी स्वच्छता करण्यात आली असून यात सुमारे 30 टन कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली असून अनेक ठिकाणी स्मशानभूमी आणि निवारा शेडला रंग देण्याचे काम करण्यात आल्याने तालुक्यातील जवळ जवळ सर्व गावांतील स्मशानभूमी चकाचक झाल्याचे दिसत आहे. या समाजसेवेमुळे सर्वत्र श्रीसदस्यांचे आणि प्रतिष्ठानचे कौतुक केले जात आहे. तालुक्यातील नेरळ, कळंब, पोशीर, कडाव, कशेळे, वारे, कर्जत, बेकरे, नेवाली, कोलीवली, वाकस, अंजप, मानिवली, धामोते, दहिवली, वरई, चिंचवली आदी गावे व आदिवासी वाड्यामध्ये असे सुमारे 170 गाव वाड्यामधील स्मशानभूमींची स्वच्छता करण्यात आली. काही ठिकाणी तुटलेल्या जागांवर नवीन बांधकाम, झाडे-झुडपे काढण्यात आली असून निवारा शेडला रंग देण्याचे काम करण्यात आले. प्रत्येक गावातील स्मशानभूमीत सुमारे 200 ते 300 टन कचरा गोळा करण्यात आला. असा सुमारे 30 ते 35 टन कचरा गोळा करून डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकून कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली. या स्वच्छता अभियानाने सर्वच गावांतील स्मशानभूमी स्वच्छ करण्यात आल्याने डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी आणि सर्व श्रीसदस्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक होत आहे. या स्वच्छता अभियानात 10 हजारांहून अधिक श्रीसदस्य सहभागी झाले होते.

सुधागडात 145 वैकुंठधाम झाले स्वच्छ

पाली : प्रतिनिधी : सुधागड तालुक्यातील पाली गोमाशी, उद्धर, विजय नगर, परळी पेडली, दिघेवाडी, वाघोशी, महागाव, नाडसूर, खेमवाडी, पाच्छापूर येथील श्री बैठक परिसरातील शेकडो गाव वाड्या पाड्यातील 145 वैकुंठधाम (स्मशानभूमी) 1975 श्रीसदस्यांनी स्वच्छ केले. सुधागड तालुक्यात स्मशानभूमी व कब्रस्तान स्वच्छ केलेला घनकचरा 15 ते 16 टन इतका त्याची जाळुन डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावण्यात आली. विशेषतः जातीभेद न करता सुधागड तालुक्यातील मुस्लीम समाजाचे कब्रस्तानही स्वच्छ केले. या कार्याचे सुधागडात सर्वस्तरातून कौतुक केले जात आहे.

मुरूड तालुक्यात 520 श्रीसदस्यांचा अभियानात सहभाग

मुरूड : प्रतिनिधी : भारताचे स्वच्छतादूत डॉ. पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज महाराष्ट्रभर गावागावातील स्मशानभूमी स्वच्छ करण्यात आल्या. मुरूड तालुक्यातील 520 श्रीसदस्यांनी सकाळी 7 वाजल्यापासून स्वच्छता मोहीम सुरू केली 68 स्मशाने स्वच्छ करून 72 टन कचरा गोळा करून सुका कचरा जाळून टाकला, तर ओला कचरा वाहनात भरून डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात आला. मुरूड, राजपुरी, अगरदांडा, नांदगाव, विहूर, काशीद, काकलघर, माजगाव, वावडुंगी, बोर्ली, दांडा आदी गावातील स्मशान स्वच्छ करण्यात आले. स्मशानभूमीतील वातावरण प्रसन्न राहावे म्हणूनच प्रतिष्ठानतर्फे श्रीसदस्यांनी तालुक्यातील प्रत्येक गावातील स्मशान स्वच्छ केले. काही ठिकाणी नवीन झाडे लावली, तर जुन्या झाडांना कुंपण घालून सुरक्षित केले. प्रतिष्ठान समाजोपयोगी उपक्रम सतत राबवत असते. कारण चांगले काम करण्याची सवय समाजाला लागावी व देशासाठी आपण थोडेसे शारीरिक श्रम करावेत ही जाणीव ह्या उपक्रमाचा मूळ हेतू आहे. यानंतर पाणीटंचाईच्या काळात विहिरी स्वच्छता मोहीम प्रतिष्ठानतर्फे  राबवण्यात येणार आहे.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply