पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील वाळवली आणि टेंभुर्डे गावांकरिता सिडकोच्या माध्यमातून पाणीपुरवठा करणार्या पाइपलाइन बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. या कामाचे भूमिपूजन सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 9) करण्यात आले.
पनवेल तालुक्यातील वळवली आणि टेंभुर्डे या गावांमध्ये सिडकोच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन बसविण्याच्या कामाचे मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले. या वेळी पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ब’चे अध्यक्ष संजय भोपी, नगरसेवक अमर पाटील, महादेव मधे, सिडको अभियंता बी. ए. पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष मारुती चिखलेकर, भाजपचे प्रभाग क्रमांक 9चे अध्यक्ष सचिन चौधरी, सुभाष भोईर, भीमराव पोवार, टेंभुर्डेचे माजी सरपंच के. के.कडव, दिलीप पाटील, देविदास पाटील, माजी उपसरपंच विश्वास पेटकर, दीपक पाटील, सुनील पाटील, हरिश्चंद्र पेटकर, महिला मोर्चाच्या प्रतिभा भोईर, श्रीवन पाटील, गोवर्धन पाटील, कृष्णा चौधरी, कृष्णा पालेकर, मंगल भोईर यांसह ग्रामविकास युवा मंचाचे पदाधिकारी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपले मनोगत व्यक्त करून कामांसंदर्भात अधिक माहिती दिली.