कर्जत : प्रतिनिधी
रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेत फेरबदल करण्यात आले आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष दत्तात्रेय मसूरकर यांची पक्षाने उचलबांगडी केली असून, या जागी कर्जत-खालापूरचे माजी आमदार सुरेश लाड यांची निवड केली आहे.
लाड यांचा 2019च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला होता. त्यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करावे यासाठी त्यांच्या समर्थकांनी जोर लावला होता, मात्र पक्षाने त्यांची जिल्हाध्यक्ष पदावर बोळवण केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात काम केल्यामुळे त्यांचा पराभव झाला, असे पक्षात बोलले जाते. त्यामुळे कर्जत, खालापूर, खोपोली या परिसरातील बेशिस्त कार्यकर्त्यांवर जिल्हाध्यक्ष म्हणून लाड हे कारवाई करणार का, याची आता उत्सुकता आहे.
Check Also
‘नैना’साठी शेतकर्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका
आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्या मुंबईच्या अनुषंगाने नैना …