पनवेल : वृत्तपत्र हे समाजाचे प्रतिबिंब आहे.पनवेलमधील पत्रकार कक्षासाठी येथील पत्रकार आग्रही आहेत. त्यांची भूमिका रास्त असून, महापालिकेत पत्रकार कक्ष स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोमवारी (दि. 6) येथे दिले.
पनवेल मीडिया प्रेस क्लबतर्फे पत्रकार दिनाचे औचित्य साधून पनवेलमधील सरस्वती विद्यामंदिर येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्या वेळी परेश ठाकूर बोलत होते. या कार्यक्रमास विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, उद्योजक मोतीलाल जैन, संजय जैन, मुख्याध्यापक व्ही. एन. राठोड, प्रेस क्लबचे अध्यक्ष गणेश कोळी, सल्लागार रमेश भोळे, पत्रकार कुणाल लोंढे, दीपक घरत, अविनाश जगधने, वैभव गायकर, अनिल कुरघोडे, राजेश डांगळे, लक्ष्मण ठाकूर, सुमंत नलावडे, सामाजिक कार्यकर्ते कमलाकर गातारे, बाबा आडवलकर उपस्थित होते.
परेश ठाकूर पुढे म्हणाले, वृत्तपत्राच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, आर्थिक, आरोग्य, तसेच करमणुकीच्या बातम्या समजतात.
ज्ञानात भर पडते. त्यामुळे वृत्तपत्र हे वाचकाला आपला मित्र वाटते. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनीही मनोगत व्यक्तकेले.
या वेळी विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले. या उपक्रमास मोतीलाल जैन व संजय जैन यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश कोळी व सूत्रसंचालन ज्ञानेश आलदर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार रमेश भोळे यांनी मानले.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …