कामोठे : रामप्रहर वृत्त – वादळी वार्याच्या तडाख्याने व पावसामुळे कामोठेमध्ये झालेल्या झाडांच्या पडझडीमुळे कामोठ्यातील रस्ते बंद झाले होते. या वेळी भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे मंडळ तर्फे रस्त्यातील झाडे बाजूला करून रस्ता नागरिकांसाठी व वाहनांसाठी मोकळा करण्यात आला.
या वेळी कामोठे मंडळ भाजप अध्यक्ष रवींद्र जोशी, प्रभाग समिती सभापती गोपीनाथ भगत, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, उपाध्यक्ष तेजस जाधव, चिटणीस मयांक कुमार, आदित्य भगत, सुरेंद्र हल्लीकर, किरण जाधव, प्रवीण कोरडे आदी उपस्थित होते.