पनवेल : रामप्रहर वृत्त – पनवेल महानगरपालिका हद्दीत बुधवारी (दि. 5) झालेल्या वादळात नुकसान झालेल्या घरांचे व अन्य अस्थापनांनचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी भाजप नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. या संदर्भात पनवेलचे तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.
नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे, पनवेल महानगरपालिका हद्दीतील बर्याच ठिकाणी बुधवारी झालेल्या वादळात अनेक ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. काही ठिकाणी अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने अनेक नागरीकांना मोठ्याप्रमाणात आर्थिक परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे या पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई लवकरात लवकर होणे अत्यंत गरजेचे आहे. जेणेकरुन नागरिकांना त्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागणार नाही. त्याचप्रमाणे ह्याच महिन्यात काही दिवसातच श्री. गणेशाचे विराजमान होणार असून, त्यांच्या घरांच्या दुरुस्तीकरीता लागणार्या आर्थिक खर्चास महसुल प्रशासनाकडून लवकरात लवकर पंचनामे केल्यास त्यांना शासनाकडून मिळालेल्या नुकसान भरपाईमुळे आधार मिळेल.
वरील विषयाचे गांभीर्य लक्षात घेता ऑगस्ट महिना संपण्याच्या आत तातडीने पनवेल महानगरपालिका हडीतील सर्व वादळी वार्यापासून झालेल्या आस्थापनांचे सर्वे, पंचनामे तातडीने करुन महसूल प्रशासनाकडून नुकसान झालेल्या नागरिकांना त्यांची नुकसान भरपाई तातडीने अदा करण्यात यावी, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.