Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

डॉक्टरांना थर्मासचे वाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त – कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मासचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम भाजप शहर चिटणीस व नगरसेवक नितीन पाटील व सहकार्‍यांनी राबविला.

या वेळी उमेश ईनामदार, भाजप पनवेल शहर सोशल मीडिया सेलचे शहर संयोजक प्रसाद हनुमंते,पनवेल उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चाचे सदस्य सुशांत मोहिते, महेश सरदेसाई, विजय डिसोझा, प्रसाद कंधारे, भाजप पनवेल शहर ओबीसी मोर्चाचे समीर शहासने यांच्या हस्ते थर्मासचे वाटप करण्यात आले. या वेळी रुग्णालयातील डॉ. नागनाथ यंपल्ले, डॉ. विकास यंपल्ले, परिसेविक ज्योती गुरव, एक्सरे टेक्निशियन डॉ. गायकवाड आदि उपस्थित होते.

विद्यालयाला फर्निचर भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त – कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील यांनी स्वखर्चाने आजिवली येथील जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास टेबल व खुर्ची असे एकूण 50 हजार रुपयांचे फर्निचर भेट दिले.

या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरूणशेठ भगत, युवा नेते दशरथ म्हात्रे, पंचायत समिती सदस्य भुपेंद्र पाटील, पंचायत समिती सदस्य राज पाटील, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, नाना भागित, आप्पा भागित, प्रवीण पालव, अतिष मालुसरे, ओमकार पाटील, प्रतिक पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply