Breaking News

गणेशोत्सवात यंदाही कोकण रेल्वेमार्गावर धावणार मोदी एक्स्प्रेस

मुंबई ः प्रतिनिधी

गणेशोत्सव जवळ आल्याने मुंबईत राहणार्‍या कोकणवासियांना गावाकडचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍यांची संख्या जास्त असल्यामुळे एक्स्प्रेसचे तिकीट मिळणे अनेकांसाठी अवघड होते. तिकीट मिळत नसल्याने अनेकजण अतिरिक्त पैसे मोजून बसने जाणे पसंत करतात. यामुळेच गणेशोत्सवात चाकरमान्यांसाठी यावर्षीही मोदी एक्स्प्रेस घावणार आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी ही माहिती दिली आहे. नितेश राणे यांनी ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाही गणपतीला गावी जाण्यासाठी मोदी एक्स्प्रेस आणण्यात येणार आहे. 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता दादर रेल्वेस्थानकावरून प्लॅटफॉर्म क्र. 8वरून मोदी एक्स्प्रेस सुटणार आहे. ही एक्स्प्रेस दादरपासून कणकवलीपर्यंत जाणार असून वैभववाडीमध्ये थांबणार आहे. एक्स्प्रेसमध्ये एक वेळेचे जेवण दिले जाणार आहे, अशी माहिती नितेश राणे यांनी दिली आहे. तिकीटासाठी भाजपच्या मंडळ किंवा तालुका अध्यक्षांना फोन करायचा आहे, असे नितेश राणेंनी सांगितले आहे. कणकवली, देवगड आणि वैभववाडी येथील मंडळ आणि तालुकाध्यक्षांना संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

या दिवशी सुटणार मोदी एक्स्प्रेस…

29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता दादर रेल्वे स्थानकावरून प्लॅटफॉर्म क्रमांक 8वरून मोदी एक्स्प्रेस सुटणार आहे. ही एक्स्प्रेस दादरपासून कणकवलीपर्यंत जाणार असून, वैभववाडीमध्ये थांबणार आहे. मोदी एक्स्प्रेसमध्ये एक वेळेचे जेवण दिले जाणार आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply