Breaking News

नवी मुंबईत होणार कृत्रिम तलावांची निर्मिती

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

गणपती विसर्जन काळात नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिका, नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकाराने शहरात 125 कृत्रिम तलावांची निर्मिती केली जाणार आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होणार असला, तरी कृत्रिम तलावांची भर पडल्यामुळे नागरिकांची गैरसोय आणि विसर्जन स्थळावर गर्दी टळणार आहे.

25 जुलै रोजी आठही विभागीय स्तरावर महापालिका व पोलीस अधिकारी यांच्यासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली आहे. विसर्जनाच्या दिवशी गर्दी न होण्याच्या दृष्टीने सर्व विभागांमध्ये नागरिकांना सोयीचे ठरेल, अशा जागांवर जास्त संख्येने कृत्रिम तलाव निर्माण करावेत, तसेच तलावातील पाणीव्यवस्था, पूजा व आरतीसाठी टेबल्स, विसर्जनासाठी स्वयंसेवक व्यवस्था अशा बाबींकडेही लक्ष देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. या दृष्टीने सर्व विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी संबंधित विभागाचे सहायक आयुक्त आणि पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने शहरातील आठही विभागांतील जागांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, कृत्रिम तलावांच्या निर्मितीसाठी 125 जागा निच्छित करण्यात

आल्या आहेत. या वर्षी शहरातील काही मंडळांनी दहा दिवसांऐवजी दीड दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरविले आहे. नवी मुंबई शहरात महापालिकेची 23 विसर्जन स्थळे असून, त्यामध्ये 125 कृत्रिम तलावांची भर पडणार असून, 148 विसर्जन स्थळे निर्माण होणार आहे.

Check Also

पनवेल मनपा हद्दीतील पाणीपुरवठ्यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली पाहणी

सर्व कामे 31 मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका क्षेत्रातील नागरिकांचे …

Leave a Reply