Breaking News

खोपोलीत पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत कायम

तीन वर्षांच्या मुलाचा तोडला लचका

खालापूर : प्रतिनिधी

खोपोलीतील सोमजाईवाडी येथे मंगळवारी (दि. 4) सकाळी तीन वर्षांच्या मुलाचा कुत्र्याने लचका तोडला. श्रेयस गुरव असे बालकाचे नाव असून, कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात त्याच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूचे मांस निघाले आहे. या घटनेत सुदैवाने त्याचा डोळा वाचला आहे. खोपोली शहरात सध्या कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे. दिवसागणिक कुठे ना कुठे कुत्र्यांकडून माणसांना उपद्रव होत असल्याच्या घटना घडत आहेत. त्यात सोमजाईवाडी म्हणजे कुत्र्यांच्या बाबतीत संवेदनशील एरियाच झाला आहे. मंगळवारी सकाळी श्रेयस गुरव या मुलावर पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला. त्यात जखमी झालेल्या श्रेयसवर डॉ. गोसावी यांच्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत. खोपोलीत आतापर्यंत आठ नागरिकांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले आहेत, मात्र यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात वा भटक्या कुत्र्यांना पकडण्यात नगरपालिका अपयशी ठरली आहे.

Check Also

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …

Leave a Reply