Breaking News

रोडपाली येथे आरोग्य शिबिर, औषधांचे वाटप

कळंबोली : प्रतिनिधी

किशोर धर्मा पाटील यांच्या नेतृत्वाखाली डॉ. हर्षली एकनाथ कडके यांच्या टीमने कोरोनाच्या महासंकटात रोडपालीगाव व परिसरातील नागरिकांना दिलासा देताना विविध आजारांवरील मोफत आरोग्य शिबिर व औषधे यांचे वाटप करण्यात आले. या वेळी शेकडो नागरिकांची तपासणी करण्यात आली. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कोरोनाच्या महामारीत नागरिक मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. संपूर्ण जनता कोरोनाच्या दहशतीत जीवन जगत आहे. अनेकांचे रोजगार बंद झाले असून उद्योगधंदे बंद आहेत त्यामुळे निराधार महिला व कामगारांवर उपासी राहण्याची वेळ आली आहे. या बिकट परिस्थिती नागरिकांना दिलासा देताना रोडपाली गावच्या डॉ. हर्षली एकनाथ कडके यांनी गावच्या प्रती आपली माणूसकी व सामाजिक बांधिलकी जपत मोफत आरोग्य शिबिर व औषधांचे वाटप करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन वसंत शंकर पाटील यांच्या आर्धांगिनी यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले. या वेळी चंद्रकांत भोईर, रघुनाथ ठाकूर आदी उपस्थित होते.

सापडलेला मोबाइल पोलिसांनी केला परत

खारघर : प्रतिनिधी

कोरोनासारख्या संसर्गजन्य घातक आजारात आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पडणार्‍या खारघर वाहतुक शाखेतील वाहतुक पोलिसांनी रस्त्यावर सापडलेला मोबाइल शुक्रवारी संबंधित मोबाइल धारकाला परत करत एक आदर्श निर्माण केला आह.

खारघर शहरातील कोपरा ब्रिज येथे शुक्रवारी सायंकाळी 5 च्या सुमारास वाहतुक पोलीस मयूर पाटील व पंकज वानखेडे हे वाहतुक नियमन करीत असताना वाहतूक नियमन करत असताना एक बेवारस मोबाइल फोन मयूर पाटील यांच्या नजरेस पडला. वाहतूक पोलीस मयुर पाटील यांनी  संबंधित फोन मोबाइलवर कॉल आल्यानतर मोबाइल धारकाला तुमचा फोन सुरक्षित असल्याचे सांगत. खारघर वाहतूक शाखा येथे येण्यास सांगितले. सदर मोबाइल मालकीची खात्री पाटल्यांनंतर संबंधित मोबाइल हा सुजता जितेंद्र शर्मा या खारघर सेक्टर 12 मधील रहिवासी असलेल्या महिलेचा असल्याचे उघड झाल्यांनतर त्यांना हा फोन सुपूर्द केला. वाहतुक पोलिसांच्या या प्रामाणिकपणा बद्दल त्यांना मोबाइल धारकांनी धन्यवाद दिले. खारघर वाहतुक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण यांनी देखील वाहतुक पोलिसांनी बाजवलेल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply