रोहे : प्रतिनिधी
चिपळूण येथील शितल राजे फाऊंडेशन आणि कोकण फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मिस कोकण स्पर्धेत रोहा शहरातील अपूर्वा पाटील हिने विजेतेपद पटकावले.
मिस कोकण 2019 किताबासाठी रविवारी (दि. 24) चिपळूणमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत राज्यातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे कॉन्टेस्ट इन्चार्ज सलोनी राजे, संस्थेचे फाउंडर आणि चेअरमन प्रा. सत्येंद्र राजे यांच्यासह या क्षेत्रातील मान्यवर या स्पर्धेच्यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धेत अपूर्वा पाटील हिने ‘मिस कोकण 2019‘ किताब पटकावला. त्यामुळे तिच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अपूर्वा पाटील हिने याआधी मिस खोपोली, मिस माणगांव रणअप, मिस सिंधुदुर्ग, रायगड सुंदरी रन अप आदि अनेक किताब पटकावले आहेत.