Breaking News

द्रोणागिरी हायस्कूलची पूरग्रस्तांसाठी मदत फेरी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा हे विद्यालयसुद्धा पुढे आले. या लोकांना मदत करण्यासाठी द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा या विद्यालयातील इयत्ता नववी आणि दहावीच्या वर्गातील स्काऊट आणि गाईड युनिटचे सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापिका प्रभू, शिक्षक डी. सी. पाटील, पी. ए. थळी आदी सर्व शिक्षक या सर्वांनी पुढाकार घेऊन करंजा गावात व आजूबाजूच्या पाड्यांत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मदत फेरी काढली होती. या फेरीला गावातून जनतेने भरभरुन मदत केली. या मदत फेरीतून जमा झालेली सर्व रक्कम ही मुख्यमंत्री सहायता निधीला जमा करण्यात येणार आहे. उरण तालुक्यात पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक जाणीवेतून धावून आलेली द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम ही एकमेव शाळा आहे. पूरग्रस्तांसाठी शाळेने निधी जमा केल्याने शाळेचे परिसरात कौतुक होत आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply