
माणगाव : प्रतिनिधी
माणगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व महिला मोर्चा अध्यक्षा शर्मिला सत्वे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून माणगावमधील सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी महाडिक यांनी शुक्रवारी (दि. 4) माणगाव येथील भाजप कार्यालयात भाजप पक्षात जाहीर प्रवेश केला.
या वेळी महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांनी अश्विनी महाडिक यांचे पुष्पगुच्छ देवून भाजप पक्षात स्वागत केले. भाजपचे बाबुराव चव्हाण, संजय चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी भाजप पक्षाचे ध्येय धोरणे महाडिक यांना समजावून सांगून महिला मोर्चा तालुकाध्यक्ष शर्मिला सत्वे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या उद्देशाने काम करून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ गोरगरीब जनतेला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा असे सांगितले. प्रवेशकर्त्या अश्विनी महाडिक यांनी सुरुवातीलाच आपण पक्षाच्या माध्यमातून समाजकारणाला अधिक प्राधान्य देणार असल्याचे सांगून पक्षाची विचारधारा ग्रामीण भागातील महिलांपर्यंत पोहचवुन पक्ष संघटनेबरोबरच महिलांच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.