Breaking News

सेवानिवृत्त फौजी समीर दुंदरेकर यांचे विचुंबे गावात जंगी स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील विचुंबे गावचे सुपुत्र समीर दुंदरेकर हे भारतीय सैन्यदलातून देशसेवा करून 16 वर्षांनी निवृत्त झाले. त्यांचे गावात जल्लोषात स्वागत झाले. यानिमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने फौजी दुंदरेकर यांचा स्वागत सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी क्रांतिकारी सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव फडके यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला गेला.

या सोहळ्यास माजी सरपंच संजय म्हात्रे, विठू गोवारी, नंदकुमार भगत, रवी भोईर, पुरुषोत्तम भोईर, रवी म्हात्रे, सुनील तुपे, मिलिंद पोपेटा, राजे प्रतिष्ठान रायगड जिल्हा संघटक प्रमुख केवल महाडिक, तालुका उपाध्यक्ष विजय दुंदरेकर, सचिन दुंदरेकर आदी उपस्थित होते. फौजी दुंदरेकर यांचे कुटुंबीयांतर्फे केक कापून स्वागत करण्यात आले.

या वेळी मनोगत व्यक्त करताना समीर दुंदरेकर यांनी सांगितले की, मी देशसेवा करताना गावाचे आणि कुटुंबीयांचे मोलाचे सहकार्य लाभले. माझी देशसेवा जरी सुखरूप झाली असली तरी, काही प्रसंगांना मला सामोरे जावे लागले आहे. आज युवा पिढीमध्ये देशाभिमान वृद्धिंगत होण्याची गरज आहे. या स्वागत सोहळ्यात देशभक्तीपर गीतांनी वातावरण चैतन्यमय झाले होते. समीर यांचे भाऊ सचिन दुंदरेकर यांनी पनवेल महानगरपालिकेत कोरोना काळात चांगल्याप्रकारे सेवा बजावली असल्याचे असल्याने त्यांचा या वेळी कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. समारंभाचे सूत्रसंचालन प्रवीण मोहोकर यांनी केले.

Check Also

टीआयपीएल अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्तसोसायटी क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित टीआयपीएल सिझन ३ अंडर-१९ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन …

Leave a Reply