Breaking News

आदर्श पतसंस्थेत मिनी एटीएमची सुविधा उपलब्ध

अलिबाग : प्रतिनिधी

तालुक्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व शाखांमध्ये मिनी एटीएमची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ  शनिवारी (दि. 8) करण्यात आला.

पतसंस्थेच्या चेंढरे शाखेचा 13 वा वर्धापन दिन आणि पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांचा 67 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांच्या हस्ते या मिनी एटीएम सेवेचे उदघाटन करण्यात आले. आदर्श पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या उदघाटन समारंभास पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष सतीश प्रधान, सचिव  कैलास जगे यांच्यासह संस्थेचे संचालक व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी आदर्श भवन येथे रक्तदान तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात 51 जणांनी  रक्तदान केले. 120 जणांची नेत्रचिकित्सा करण्यात आली. त्यापैकी 15 जणांना मोतीबिंदू झाल्याचे निष्पन्न झाले. या सर्वांची मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पतसंस्थेतर्फे करण्यात येणार आहे. कुरळ ग्रामपंचायत कार्यालयासमोरील चौकाचे सुशोभीकरण  आदर्श पतसंस्था करणार आहे. या कामाचे भूमिपुजन सुरेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी कुरुळचे सरपंच अ‍ॅड. जनार्दन पाटील, उपसरपंच स्वाती पाटील, पतसंस्थेचे  सतीश प्रधान, कैलास जगे, सुरेश गावंड, अभिजित पाटील, विलाप सरतांडेल यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ, पतसंस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply