Breaking News

भावी जिल्हाधिकारी आदिवासींच्या दारी

विविध प्रश्नांचा आढावा; भौगोलिक रचनेचाही केला अभ्यास

कर्जत ः बातमीदार – केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झालेल्या आणि आपल्या परिविक्षाधीन सेवेचा कार्यकाळ पूर्ण करीत असलेले आयएएस अधिकारी माणिक घोस सध्या रायगड जिल्ह्यात आहेत. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सूचनेनुसार परिविक्षाधीन आयएएस घोस यांनी कर्जत तालुक्यातील आदिवासी समाजाचे प्रश्न समजून घेतले. दरम्यान, दिवसभर तालुक्याच्या दुर्गम आणि आदिवासी भागात फिरून आदिवासी समाजाचे प्रश्न समजून घेतानाच या भागाच्या भौगोलिक रचनेचाही त्यांनी अभ्यास केला.

स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अशा अधिकार्‍यांना काही काळ शासनाशी संबंधित सर्व विषयांची माहिती व्हावी यासाठी गाव पातळीपासून जिल्हा पातळीवर काही गोष्टीची माहिती व्हावी यासाठी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन शिकावे लागते. भावी जिल्हाधिकारी या पदाची केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेले सनदी अधिकारी माणिक घोस सध्या रायगडात परिविक्षाधीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आहेत.

भावी जिल्हाधिकारी माणिक घोस यांच्या दौर्‍यात कर्जत पंचायत समितीच्या उपसभापती भीमाबाई पवार, पेण आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प निरीक्षक जगदिश भानुशाली, दिशा केंद्र कार्यकर्ते अशोक जंगले, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे प्रभारी उपअभियंता प्रल्हाद गोपणे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी बी. एच. जाधव, काशिनाथ गायकवाड, एकात्मिक बालविकासचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर, निशिगंधा भवाळ आदी सहभागी झाले होते.

Check Also

वीर वूमन्स फाउंडेशनकडून वडाळे तलाव स्वच्छतेसाठी 12 डस्टबिन

पनवेल : रामप्रहर वृत्तवडाळे तलाव पनवेलचा केंद्रबिंदू असून हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, …

Leave a Reply