Breaking News

मुरूडमधील दत्तवाडी रस्त्यावर गतिरोधक बसवा; नागरिकांची मागणी

मुरूड : प्रतिनिधी

शहरातील परेश हॉटेल ते दत्तवाडी या मुख्य रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. या रस्त्यावर सूचना फलक लावावेत व गतिरोधक उभारावेत, अशी मागणी दत्तवाडी परिसरातील नागरिकांनी मुरूड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुरूड दत्तवाडी परिसरातील नागरिकांनी  सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता गोरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन लेखी निवेदन दिले. या वेळी माजी सरपंच अजीत बाळकृष्ण कासार, प्रवीण भायदे, रुपेश रणदिवे, मंगेश मोहिते, उमेश भगत, सुनील देवगणे,  विनोद भायदे व  प्रणव दिवेकर व अन्य नागरिक उपस्थित होते. मुरूड शहरातील सार्वजनिक बांधकाम कार्यलयाजवळून जाणारा परेश हॉटेल ते दत्तवाडी हा रस्ता नवीन असल्याने त्यावरून दुचाकी वाहने वेगाने चालविली जातात. या रस्त्यावर झालेल्या अपघातात एका 22 वर्षीय तरुणाचा  मृत्यू झाला आहे. या रस्त्यावर वारंवार अपघात होत असल्याने त्याठिकाणी सूचना फलक लावावेत व गतिरोधक उभारावेत, अशी मागणी   सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपअभियंता गोरे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. परेश हॉटेल ते दत्तवाडी या रस्त्यावर लवकरच सूचना फलक व गतिरोधक उभारण्यात येतील, असे   उपअभियंता गोरे यांनी या वेळी सांगितले.

Check Also

डिस्टन्स इलेव्हनने पटकावले नमो चषक व्हॉलीबॉल विजेतेपद

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने भव्य क्रीडा महोत्सव अर्थात नमो चषक …

Leave a Reply