पनवेल : रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 5) आतापर्यंतच्या सर्वाधिक तब्बल 769 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 14 रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे दिवसभरात 451 जण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता व्यक्त होत आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 334, अलिबाग 109, महाड 90, पेण 53, माणगाव 42, कर्जत 34, रोहा 30, खालापूर 25, पोलादपूर 18, सुधागड 15, उरण 14 आणि श्रीवर्धन तालुक्यातील पाच जणांचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल तालुक्यात आठ, माणगाव दोन आणि खालापूर, कर्जत, पेण व रोहा तालुक्यातील प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 30,807 व मृतांची संख्या 884 झाली आहे. जिल्ह्यात 25,245 जण कोरोनामुक्त झाल्याने 4678 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …