Breaking News

पनवेलमध्ये भाजप अनुसूचित जाती मोर्चाचा मेळावा उत्साहात

पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान

पनवेल : रामप्रहर वृत्त
देशाचे यशस्वी व लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या आठव्या वर्षपूर्तीनिमित्त होणार्‍या सेवा, सुशासन व गरीब कल्याणपर्व कार्यक्रम अंतर्गत पनवेल शहर भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात गुरुवारी (दि. 9) मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मान्यवरांनी मार्गदर्शन केले तसेच अनुसूचित जाती मोर्चाच्या विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
मोदी सरकारकडून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ अनेक निर्णय घेण्यात आले. लंडनचे वसतिगृह विकत घेणे, आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी मुंबईतील इंदू मिलची जागा हस्तांतरण, जन्मभूमी महू, लंडन शिक्षण भूमी, नागपूर दीक्षाभूमी, दिल्ली महापरिनिर्वाण भूमी आणि दादरची चैत्यभूमी ही पाच ठिकाणे पंचभूमी म्हणून घोषित करून डॉ. आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे. नागपूरजवळील चिंचोली येथे संग्रहालय उभारण्यात येणार आहे. टपाल तिकीट आणि चांदीची दोन नाणी तयार केली आहेत. दिल्ली येथील 15 जनपथ मार्गावर 195 कोटी रुपये खर्च करून डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय अध्ययन केंद्र उभारणीचे काम सुरू आहे. आर्थिक भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या हस्ते ’भीम आधार’ योजनेचाही (भीम अ‍ॅप) शुभारंभ करण्यात आला. याशिवाय अनुसूचित जातीसाठी असलेला निधी भरघोस प्रमाणात खर्च करण्यात आला असून कौशल्य विकास प्राशिक्षण या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या नागरिकांना प्राशिक्षण देण्यात आले. माता रमाई आंबेडकर यांच्या जन्मगावी त्यांच्या नावाने स्फूर्तिस्थळ उभारण्याचे घोषित केले आहे. अशा प्रकारे महामानव डॉ. आंबेडकरांच्या आदर व सन्मानापोटी मोदी सरकार झटते आहे. याची माहिती मेळाव्यात देण्यात आली.
आपल्यासाठी झटणारा एकमेव पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष! आज आपल्याला या पनवेलमध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मौलिक आशीर्वाद आणि सहकार्य मिळत आहे. आमदार प्रशांत ठाकूर हे कर्तव्यदक्ष आमदार अहोरात्र झटत आहेत. परेश  ठाकूर यांच्या रूपात लोकांचे मूलभूत प्रश्न सोडविणारे निडर सभागृह नेते लाभले आहेत. या सर्व गोष्टी जाणून आपण आपला भाजप मजबूत आणि बलवान करून समाजाच्या विकासास हातभार लावूया, असे आवाहन भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी केले.
सक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने यशस्वी आठ वर्षे पूर्ण केली आहेत. या कालावधीत या सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक योजना जाहीर करून त्यांचा लाभ जनतेला दिला. या योजनांची माहिती जास्तीत जास्त सर्वसामान्यांपर्यंत पोहचावी याकरिता भाजपच्या वतीने सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणपर्व कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अंतर्गत भाजपच्या पनवेल येथील मध्यावर्ती कार्यालयात अनुसूचित जाती मोर्चाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात उपस्थित पदाधिकार्‍यांनी मार्गदर्शन करून योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्याच्या सूचना केल्या.
भाजप पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे यांनीही मार्गदर्शन करताना पक्षाची बाजू मांडून भाजप हा कशा प्रकारे अनुसूचित तसेच इतर समाजासाठी आस्थेने व जबाबदारीने कामे करतो याची उदाहरणे देऊन पक्षाची प्रामाणिक धोरणे पटवून दिली
या मेळाव्यास युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजप शहर सरचिटणीस अमरीश मोकल, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अरुण सोलंकी, दिनेश गायकवाड, सरचिटणीस प्रभाकर पवार, शहर अध्यक्ष श्याम साळवी, तालुका उपाध्यक्ष रावसाहेब खरात, झोपडपट्टी सेल उत्तर रायगड जिल्हा संयोजक राहुल वाहुळकर, महिला आघाडीच्या उपाध्यक्ष विठाबाई सावंत, पप्पू साळवे, आनंद जाधव, विजय झिरे, प्रकाश बोरुडे, गोपाल पट्टे, राजू झिरे, अजय सकपाळे, दर्शन वाहुळकर, गणेश जाधव, हिरामण सांळुखे, योगेश खरात, विनोद बोदाडे, उमेश कांबळे, सागर जाधव, गणेश झिरे, जितेंद्र राजभर, स्वप्नील वाहुळकर, सद्दाम शेख, आनंद वाहुळकर, अमोल लहाने, शंकर म्हस्के, संदेश जाधव, अशोक मिसाळ, सुभाष कांबळे, निखिल जाधव, नरेश शिर्के, रावसाहेब थोरात, शांताराम कोळी, आनंद गुरव, गोपीनाथ लोखंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येेने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून पनवेल शहर अनुसूचित मोर्चाच्या विविध पदांवर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यामध्ये उपाध्यक्षपदी मधुकर उरणकर, संदेश जाधव, सरचिटणीसपदी नितेश केदारे, चिटणीसपदी कविता पवार, खनिदारपदी सुजीत खंडीझोड, सदस्यपदी विजय झिरे, आनंद जाधव, सागर वानखेडे, निखील जाधव, नंदा टापरे, संजय कांबळे, विजयकुमार जाधव, अमोल जाधव यांचा समावेश आहे.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply