Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

खारघर रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिर

पनवेल : वार्ताहर – देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो उत्तर रायगड तर्फे खारघर येथे भव्य रक्तदान शिबिर व प्लाझ्मा दान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी उपमहापौर विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी उपस्थित राहून रक्त दात्यांशी संवाद साधला तसेच उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी रक्त दात्यांना प्रशस्ती पत्रही देण्यात आले. या वेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रशांत कदम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, प्रभाग समिती सभापती संजय भोपी, नगरसेवक अनिता पाटील, अभिमन्यू पाटील, अजय बहिरा, गोपिनाथ भगत, मा. जिल्हा सरचिटणीस समीर कदम, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, खारघर मंडल अध्यक्ष विनोद घरत, पनवेल मंडल अध्यक्ष रोहित जगताप, कळंबोली मंडल अध्यक्ष अमर ठाकूर, सोशल मीडिया प्रमुख परेश बोरसे, महिला सहकारी गीता चौधरी, निशा सिंग, बिना घोगरी, मोना अडवाणी, चांदणी चुग अवघडे, जयश्री धापटे, युवा सहकारी सुशील शर्मा, विवेक होन, तेजस जाधव, भीमराव गेंड, उदय पाटील, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

उरण स्वच्छता अभियान

उरण : वार्ताहर – देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त भाजप उरण यांच्या वतीने स्वच्छता सेवा सप्ताह 14 ते 20 सप्टेंबरपर्यंत आहे. उरण शहर व तालुक्यातील   कोप्रोली येथे गुरुवार (दि.17) रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात  आले. या वेळी शशि पाटील चिरनेर विभाग अध्यक्ष, युवा अध्यक्ष प्रवीण घासे, उरण तालुका महिला अध्यक्षराणी म्हात्रे, कुलदीप नाईक, मुकुंद गावंड, प्रशांत ठाकूर यांनी विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविली. तसेच कोप्रोली येथे तलावाच्या सभोवताली  झालेला कचरा, प्लास्टिकची घाण काढण्यात आली. त्या वेळी युवा चिटनीस कल्पेश म्हात्रे, तालुका पदाधिकारी दत्तराज म्हात्रे, युवा नेते प्रितम म्हात्रे, जेष्ठ कार्यकर्ता गजानन पाटील, विकास (विकिभाई) म्हात्रे, कार्याध्यक्ष कोप्रोली भाजप नीलेश पाटील, युवा नेते हितेश म्हात्रे, शेखर म्हात्रे, युवा अध्यक्ष बबन म्हात्रे, योगेश गावंड, जीवन म्हात्रे आदी उपस्थित होते.

महाड फळवाटप, वृक्षारोपण

महाड : प्रतिनिधी – भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस संपूर्ण देशात सेवा सप्ता म्हणून साजरा केला जात आहे. महाड भाजपाच्या वतिने देखील गुरुवारी शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिक्षक डॉ.  भास्कर जगताप यांच्या उपस्थितीत रुग्णांना फळवाटप करण्यात आले, तसेच राजमाता जिजाऊ यांच्या समाधीस्थळी वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला. या सेवा सप्ताहात स्वच्छता मोहीम, रुग्णांची सेवा, आदिवासींना मदतीचे वाटप असे कार्यक्रम केले जाणार आहेत. या वेळी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी, संदीप ठोंबरे, तालुका सरचिटणीस महेश शिंदे, विठ्ठल घाग, अक्षय ताडफळे, प्रभाकर झांजे, निलेश तळवटकर, अप्पा सोंडकर, शैलेश बुटाला, श्वेता ताडफळे, तुषार महाजन, दिनेश अंबावले आदि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

कळंबोली फळवाटप

कळंबोली : प्रतिनिधी – देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या  वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून सेवा सप्ताह राबविला जात आहे. याअंतर्गत गुरूवारी (दि. 17) कळंबोली वसाहतीतील सत्यम हॉस्पिटलमध्ये पक्षाच्या वतीने फळांचे वाटप करण्यात आले.पनवेल तालुक्यात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सेवासप्ताह प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोरोना संकटात रुग्णांना मदत व्हावी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली भाजपचे सचिव संतोष गायकवाड यांच्या हस्ते सत्यम हॉस्पिटल कळंबोलीमधील रुग्णाना फळांचे वाटप करण्यात आले. या वेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

अलिबाग बिस्कीट वाटप

अलिबाग : प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप अलिबाग तालुका व अलिबाग शहर तर्फे कोविड रुग्णालयातील कोविड रुग्णांना बिस्कीट वाटप करण्यात आले. भाजप ओबीसी सेल अध्यक्ष  अशोक वारगे याच्या हस्ते कोविड रुग्णांना बिस्कीट वाटप करण्यात आले. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, अलिबाग तालुका अध्यक्ष परशुराम म्हात्रे, अलिबाग शहर अध्यक्ष अ‍ॅड. अंकित बंगेरा यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम करण्यात आला.

कामोठे फळवाटप

कामोठे : रामप्रहर वृत्त – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाजप कामोठेच्या वतीने गुरुवारी (दि. 17) कामोठ्यातील तीन कोविड हॉस्पिटल व दोन नॉन कोविड हॉस्पिटल येथील रूग्णांना फळवाटप करण्यात आले. फळांचे बॉक्स हॉस्पिटलकडे सुपुर्द करण्यात आले. तसेच झोपडपट्टी विभागात जाऊन नागरिकांना फळे वाटप करण्यात आली. या वेळी नगरसेवक डॉ. अरूण भगत, नगरसेवक विकास घरत, कामोठे मंडल महामंत्री सुशील कुमार शर्मा, रायगड जिल्हा महिला मोर्चा चिटणीस जयश्री धापते, कामोठे मंडल युवा मोर्चा उपाध्यक्ष तेजस जाधव, भाजप रायगड वैद्यकीय सेल जिल्हा सदस्य व फळे वाटप मंडळ कार्यक्रम प्रमुख डॉ. अनिल पराडकर, सुरेंद्र हल्लीकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

खोपोली फळवाटप

खोपोली : प्रतिनिधी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत खोपोली भाजपतर्फे आदिवासी वस्तीत फळवाटप करण्यात आले. या वेळी शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला शहर सरचिटणीस हेमंत नांदे, शहर उपाध्यक्ष चंद्रप्पा अनिवार, दिलीप पवार, युवा नेते साचीन  मोरे, चिटणीस गोपाळ बावसकर, प्रमोद वाघ आदी उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply