नऊ जणांचा मृत्यू; 353 रुग्णांना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधी – पनवेल तालुक्यात गुरुवारी (दि.17) कोरोनाचे 400 नवीन रुग्ण आढळले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर 353 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 299 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे तर 252 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 101 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 101 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल येथील सेक्टर 16 गिनी पार्क, सेक्टर 18, खांदा कॉलनी येथील सेक्टर 14 मध्ये सह्याद्री अपार्टमेन्ट व पीएल 6 ए, कळंबोली येथील सेक्टर 9 निलसिंधी अमरांते, सेक्टर 4 ए आसूडगाव, कामोठे येथील सेक्टर 16 इंद्रमहल सोसायटी, सेक्टर 14 रिध्दी सिध्दी, सेक्टर 7 शितलधारा सोसायटी, अशा एकूण नऊ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गुरुवारी आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 35 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2638 झाली आहे. कामोठेमध्ये 70 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 3477 झाली आहे. खारघरमध्ये 77 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 3250 झाली आहे.
नवीन पनवेलमध्ये 45 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2948 झाली आहे. पनवेलमध्ये 63 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2830 झाली आहे. तळोजामध्ये 9 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 698 आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 15841 रुग्ण झाले असून 13298 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.95 टक्के आहे. 2178 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 365 जणांचा मृत्यू झाला आहे.
उरण तालुक्यात 14 नवे रुग्ण; सहा रुग्णांचा मृत्यू
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी – उरण तालुक्यात गुरुवारी कोरोनाचे 14 नवे रुग्ण आढळले असून सहा रुग्णांचा मृत्यू व 42 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये नवघर तीन, सोनारी दोन, जेएनपीटी, श्री गणेश कृपा अपार्टमेंट, भवरा, वसुंधरा सोसायटी द्रोणागिरी, न्हावा शेवा, मोरा कोळीवाडा एकविरा मंदिर जवळ, तेलीपाडा, साई निकेतन, पाणजे येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर चाणजे, एनएडी करंजा, केगाव, म्हातवली गणपत वाडी, राजेश हॉटेल जवळ बोकडवीरा, श्रेयस अपार्टमेंट उरण येथे प्रत्येकी एक असे एकूण सहा रुग्णांचा मृत्यु झाला आहे. तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1699 झाली आहे. 1424 बरे झाले आहे. 190 रुग्ण उपचार घेत आहेत व 85 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कर्जतमध्ये 34 कोरोना पॉझिटिव्ह
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार – कर्जत तालुक्यात गुरुवारी 34 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. आतापर्यंत तालुक्यात 1369 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 1076 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कर्जत विधानसभा मतदार संघाचे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांचा कोरोना टेस्टचा रिपार्ट पॉझिटिव्ह आला आहे. असे त्यांनी सोशल मीडियावर स्पष्ट केले आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची लक्षणे आढळल्यास लगेचच कोरोनाची टेस्ट करून घेण्याचे आमदार थोरवे यांनी सांगितले आहे.