पनवेल ः भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रतर्फे भारताच्या नवनिर्माणासाठी प्रयत्नशील, पारदर्शक प्रशासक, आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी 4 वाजता व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर जनतेला संबोधित करणार आहेत. या वेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप मुंबई प्रदेश अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष जयकुमार रावल, भाजप महाराष्ट्र महामंत्री श्रीकांत भारतीय यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. व्हर्च्युअल रॅलीत सहभागी होण्यासाठी यू ट्यूब लिंक : bit.ly/18VRMaha, फेसबुक लिंक bit.ly/18VRMaha_FB येथे सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. व्हर्च्युअल रॅलीत सर्व बूथमधील कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींनी नागरिक व कुटुंबासह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले आहे.
Check Also
तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा
कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …