Breaking News

खालापुरात कंपनीला भीषण आग, मोठ्या प्रमाणात नुकसान

खालापूर, खोपोली : प्रतिनिधी

खालापुरातील खोपोली-पाली मार्गावर उंबरे गावच्या हद्दीत असलेल्या ब्राईट ईव्हरमेंट सोल्युशन कंपनीला लागलेल्या आगीत गोडाऊन पूर्णपणे जळून खाक झाले असून प्लँटचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या कंपनीच्या आवारातच कामगार राहत असल्याने आगीचे प्रमाण पाहता लवकरात लवकर आग आटोक्यात आणणे गरजेचे होते. खोपोली फायर ब्रिगेड टीम, प्रसोल केमिकल फायर ब्रिगेड टीम, गोदरेज कंपनीच्या फायर फायटिंग टीमने पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियत्रंण मिळविले. तरी गोडाऊनला लागलेली आग मात्र धुमसत आहे. प्लास्टीकवर प्रक्रीया उद्योग असल्याने मोठ्या प्रमाणात आग पसरली.

कपंनीच्या जवळून गेल इंडियाची पाइपलाइन जात असल्याने गेल इंडियाच्या फायर फायटिंग टीमसह खालापूर पोलीसही घटनास्थळी उपस्थित होते. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सस्थेंच्या टीमचे सदस्य असलेल्या केमिकल एक्स्पर्ट धनजंय गीध सह गुरुनाथ साठीलकर, विजय भोसले, अमित गुजरे, अंकित साखरे, शैलेश आबंवणे, यतिन दळवी, तसेच अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी मोलाची मदत केली.

Check Also

कोकण मराठी साहित्य परिषदेच्यासल्लागारपदी लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तकोकण मराठी साहित्य परिषदेच्या सल्लागारपदी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची नियुक्ती …

Leave a Reply