Breaking News

महाड इमारत दुर्घटनेप्रकरणी सहाव्या आरोपीला अटक

महाड, अलिबाग : प्रतिनिधी
येथील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेला जबाबदार असलेल्या बिल्डर्ससह पाच जणांवर गुन्हे दाखल करून एकाला अटक झाली होती. पोलिसांनी शनिवारी (दि. 29) आणखी एकाला अटक केली. त्यामुळे या गुन्ह्यात आरोपींची संख्या आता सहा झाली आहे.
महाडच्या काजळपुरा भागाील तारिक गार्डन ही पाच मजली इमारत 24 ऑगस्टला सायंकाळी कोसळून 16 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोषी असलेल्या बिल्डरवर कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अनिल पारसकर यांनी दिल्यानंतर महाड नगर परिषदेचे  ज्युनिअर इंजिनिअर सुहास कांबळे यांनी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तत्कालीन मुख्याधिकारी दिपक झिंजाड यांनी या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र देताना हलगर्जीपणा केला असल्याचा ठपका ठेवला आहे. त्याचबरोबर विकसक फारुक काझी, आरसीसी सल्लागार बाहुबली धमाने, वास्तूविशारद गौरव शहा यांनी निकृष्ट काम केले, तर पालिकेचे तत्कालीन ज्युनिअर इंजिनिअर शशिकांत दिघे यांनी इमारतीला रहिवासी दाखला देताना योग्य तपासणी केली नसल्याचा आरोप असून, त्यांच्यावर भा. द. वि. 304,304 अ,337 व 338, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापैकी विकसक फारुक काझी फरारी झाला, मात्र आरसीसी सल्लागार बाहुबली धमाने याला अटक झाली होती.
पोलिसांनी या प्रकरणात बिल्डरचा पार्टनर युनुस शेख याला शनिवारी अटक केली, मात्र हा आरोपी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट असल्याने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या गुन्ह्यातील आरोपींची संख्या सहा झाली आहे आणि ती वाढण्याची शक्यता आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply