पनवेल : वार्ताहर
आयुष्यात सुख दुःख काही मिळून शेवट मात्र स्मशानभूमी होत असतो स्मशानभूमी नाव काढताच अनेकांना भीती वाटते. मात्र पनवेलच्या तक्का येथील महानगरपालिकेच्या स्मशानभूमीमध्ये दररोज फूलतो फूल झाडांचा मळा या करता ओम साई मित्र मंडळ आणि दर्यासागर बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष गणेश मारुती वाघिलकर यांच्या सर्व सहकार्यांनी घेतलेली मेहनत प्रामाणिकपणे केलेली देखभाल आज या स्मशानभूमीमधील आलेल्या सोनचाफाची फुले भारतरत्न स्वर साम्राज्ञी लता मंगेशकर घरात गेली असून पूजे करता ही फुले वापरात आलेली आहे, तर मनसे अध्यक्ष यांच्या पत्नीकडून सुद्धा येथील सोनचाफाची फुले एकवीरा देवीच्या चरणी वाहिली गेली आहे. स्मशानच्या मोकळ्या जागेत पडलेला रेबिट काढून संस्थाचे संस्थापक गणेश वाघीलकर यांच्या मनात या ठिकाणी फुलझाडांची शेती करण्याचा ही संकल्पना आली. व त्यांनी ती अमलात आणून कामाला सुरुवात केल्यावर स्मशानभूमीचे रूपांतर एका शेतीमध्ये झाले. विविध पिक तर विविध फुले येण्यास येथे सुरुवात झाली. वांगी, आळुची पाने, माठाची पालेभाजी, तोंडली, लिंबु, गुलाब, मोगरा, शेवगा, तुळस, फुलझाडे विविध प्रकारचा सोनचाफा, कवठीचाफा, हिरवाचाफा, जास्वंदी, तगडी, तेरडा, प्राजक्ता, झेंडु, रातराणी, अबोली, पुजेचे बेल, दुर्वा, शमी, फळझाडे, नारळ, आंबा, आवळा, फणस, जाम, कोकम, चिकु, सिताफळ, चिंच, बोरं, अननस, पपई, भाजी, कढीपत्ता, गवती चहा, भेंडी, मिरची, कारली, शिरवली, घोसाळी, दोडका, भोपळा, तीळ, घेवडा, निलगीरी, पेरु, कृष्णकमळ, ब्रम्हकमळ, सदाफुली बहरून गेला आहे. येथील सफाई कामगार रमेश महादेव गरुडे यांनी याच स्मशानभूमीमध्ये अभ्यास करुन यशवंतराव चव्हाण विद्यापीठातून ग्रज्युॅएशन पुर्ण केले आहे. अनेक नागरिक मॉर्निंग वॉकला येथे येतात. शाळा महाविद्यालय विद्यार्थी येथे अभ्यास करतात काही या ठिकाणी विविध पक्षांनी आपली घरटी बांधली आहेत. उन्हाळ्यात पाण्याचे पंप गाढीनदीत लाऊन पाणी मारले जाते. स्मशान भूमि मध्ये स्वच्छता नेहमीच ठेवण्यात येते. या मळ्याची देखभाल गंगाराम बेटकर, महादु शैळके, करतात या स्मशानभूमीमध्ये आल्यावर अनेकाच्या मनातील भीती निघून गेली असून आनंद काय असतो याचा अनुभव पाहायला मिळतो.