लडाख : वृत्तसंस्था
भारताच्या एक इंचही जमिनीला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही किंवा त्यावर कब्जा करूही शकणार नाही. आम्हाला शांतता हवी आहे. भारताने कोणत्याही देशाच्या स्वाभिमानावर कधी हल्ला केला नाही, मात्र भारताच्या स्वाभिमानावर हल्ला करण्याचा प्रयत्न जर झाला, तर ते सहन केले जाणार नाही. त्यांना जशास तसे उत्तर देण्यात येईल, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनला दिला आहे.
संरक्षणमंत्री सिंह यांनी शुक्रवारी (दि. 17) लेहचा दौरा केला. या दौर्यात त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यानंतर यांनी जवानांना संबोधित केले. जर भारताच्या स्वाभिमानावर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते सहन करणार नाही आणि त्यांना योग्य भाषेत उत्तरही दिले जाईल. सध्या भारत आणि चीनदरम्यान जी काही चर्चा झाली ती सकारात्मक आहे. या प्रकरणाचा तोडगा निघाला पाहिजे, परंतु हा तोडगा कुठपर्यंत निघेल याची सध्या कोणतीही हमी मी आता देऊ शकत नाही’, असे संरक्षणमंत्री म्हणाले.
Check Also
अलबेला @ ७५ वर्षे भोली सुरत दिल के खोटे….
काही चित्रपट चित्रपटगृहातून उतरतात, काळ पुढे सरकत राहतो, बराच पुढे सरकतो. चित्रपट रसिकांच्या किमान तीन …
RamPrahar – The Panvel Daily Paper