Breaking News

नवी मुंबईतील ईटीसी शाळा सुरू करा -आमदार मंदा म्हात्रे

नवी मुंबई : बातमीदार

ईटीसी केंद्र हे केंद्र नसून शाळा असल्याचा निर्वाळा 18 जुलै 2018 च्या शासन निर्णयानुसार उघड झाले आहे. दोन वर्षे होऊनही कोणत्याच आयुक्तांनी याबाबत ठोस भूमिका घेतली नसल्याने काही अधिकार्‍यांचे फावले आहे. विद्यमान आयुक्तांनी याबाबत तातडीने निर्णय घेत शाळेच्या नियमांनुसार येथे दिव्यांगांसाठी शाळा सुरू करावी. दोषी अधिकर्‍यांची चौकशी करून कारवाई करावी अन्यथा येत्या विधानसभेत हक्कभंग आणणार असल्याचा इशारा आमदार मंदा म्हात्रे यांनी केला. वाशी येथे मंगळवारी अयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शासनाने केलेला कायदा व त्याआधारे राज्यातील दिव्यांग केंद्रांना होणारा फायदा तसेच नवी मुंबईतील ईटीसी केंद्रात सुरू असलेल्या अनियमिततेवर बोट ठेवले. पालिकेने 2008 साली दिव्यांगांसाठीचे ईटीसी केंद्र सुरू केले. 2008 ते 2015 पर्यंत हे ईटीसी केंद्र सुरळीत सुरू होते. मात्र नंतर हे केंद्र की शाळा असा वाद सुरू झाला. 2015 साली नवी मुंबई महानगरपालिकेच्या ईटीसी शाळेतील भ्रष्टाचार उघडकीस आणून दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेच्या सर्व सुविधा प्राप्त व्हाव्या यासाठी लढा सुरू केला होता. तसेच हे केंद्र शाळेच्या मान्यतेनुसार सुरू व्हावे याकरिता एक लढाई सुरू केली होती. सामाजिक दृष्टिकोनातून सुरू केलेल्या या लढाईत दिव्यांग विद्यार्थ्यांचे पालक, शिक्षक देखील सोबत होते.  महापालिका प्रशासन ही शाळा म्हणून मान्यच करीत नव्हती. 2007 मध्ये पुणे येथील अपंग आयुक्तालयात महाराष्ट्र अपंग व्यक्ती नियम 2001 कलम 43 नुसार ईटीसीला शाळा महणून मान्यता देण्यात आली आहे. सन 2015 साली अपंग आयुक्तालयाच्या तपासणी अहवालात टीभी है माला असल्याचे नमूद केले आहे. शासनाने मंजूर केलेला आकृतिबंध हा शाळेच्या धर्तीवर मंजूर केलेला आहे. केंद्र म्हणून चालवण्यात येत असणारा हा भूखंड सिडकोने शाळा म्हणून महापालिकेम हस्तांतरित केलेला होता. 18 जुन 2018च्या शासन निर्णयानुसार ईटीसी हे केंद्र नसून शाळा असल्याचे उघड झाल्याने दिव्यांग विद्याथ्यांना सहा तास शिक्षण, येण्या-जाण्यासाठी बसची सुविधा, शाळेच्या नियमाप्रमाणे सहा तास शिक्षण असे शाळेचे सर्व नियम लागू होणे आवश्यक असताना पालिकेकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप आ. म्हात्रे यांनी केला. त्यामुळे पालिका आयुक्तांनी यावर तातडीने कारवाई करावी तसेच शाळा म्हणून हे केंद्र चालवावे. त्याप्रमाणे रचना करावी. या केंद्रात आतापर्यंत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी लावून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करावी अन्यथा येत्या विधानसभेत हक्कभंग आणणार असून सभागृहातील सर्व आयुधांचा वापर करणार असल्याचा इशारा आ. म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिला. या वेळी या केंद्राचे शाळेत रूपांतर व्हावे यासाठी लढणारे पृथ्वी पालक संघटनेचे शंतनू साठेपाटील म्हणाले की, मी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे दाद मागण्यासाठी गेलो होतो, मात्र त्यांनी काहीही न ऐकता उडवून लावले, पण आ. मंदा म्हात्रे यांनी मात्र तातडीने मदत केली.

दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळणारा लाभ

सध्या केंद्रात दिव्यांगांसाठी दोन तास शिकवले जाते. शाळा संहितेखाली आणल्यास सहा तास शिकवावे लागणार. त्याचा फायदा दिव्यांगांना होणार आहे. शाळा कायद्याखाली सध्या खासगी स्वरूपात काम करणार्‍या मुख्याध्यापकांना, शिक्षकांना व कामगारांना पगार वाढ मिळून शाळेचे सर्व लाभ मिळणार. मुलांना बस सुविधा पुरवावी लागणार. त्यांना शिष्यवृत्ती, मध्यान्ह भोजन द्यावे लागणार. पालिका शाळांप्रमाणे त्यांना सर्व सुविधा द्यावा लागणार शाळेतील मुलांना 18 वर्षांपर्यंत शिक्षण द्यावे लागणार, त्यांनंतर त्यांना कौशल्य प्रक्षिक्षण देऊन त्यांचे पुनर्वसन करावे लागणार. सध्या पालिकेत अनेक दिव्यांगांच्या जागा रिकाम्या आहेत पालिकेला स्वतःच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांतून पाच संवर्गातील पदे भरता येऊ शकतील.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply