Breaking News

ऑल इंडिया सिफेरर्स अॅण्ड जनरल वर्कर्स युनियनतर्फे शिपिंग क्षेत्रातील फसवणुकीविरोधात आंदोलन

पनवेल : वार्ताहर

अनेक वर्षांपासून शिपिंग क्षेत्रातील चालू असलेल्या फसवणुकीला विरोध करण्यासाठी आज ऑल इंडिया सिफेरर्स अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स युनियनतर्फे नवी मुंबईतील बेलापूर येथे आंदोलन करण्यात आले.

वर्षानुवर्ष नवी मुंबई हे शिपिंग क्षेत्रात हे एक अग्रगण्य शहर आहे. येथे शिपिंग क्षेत्रातील प्रशिक्षण देणार्‍या अनेक संस्था असून अनेक शिपिंग कंपन्या आहेत. यातील बर्‍याच कंपन्या यांच्या कडे रिक्ररूटमेंट अँड प्लेसमेंट सर्विसेस लायसन्स नसूनसुद्धा अनेक वर्ष बेरोजगार तरुणांची आर्थिक फसवणूक करतात. तसेच काही कंपन्यांचे लायसन्स हे डायरेक्टर जनरल ऑफ शिपिंग यांच्याकडून रद्द करण्यात आले असून ते राजरोस कंपन्या चालवतात आणि बेरोजगरांची आर्थिक फसवणूक करतात, असा आरोप युनियचा आहे.

या सर्व गोष्टी लक्षात घेता यावर अंकुश ठेवणे अत्यंत गरजेचे असून युनियन गेले तीन वर्षांपासून प्रयत्न करूनही या प्रकरणांत घट दिसून येत नाही. रोज नवीन गुन्हे घडताना दिसतात. वारंवार पोलीस तक्रार करूनदेखील या गोष्टी बंद होत नाही. यंत्रणा कमी पडतात, असे युनियन अध्यक्ष संजय पवार यांचे स्पष्ट मत आहे. युनियनतर्फे समाजप्रबोधन आणि जनजागृती करण्यात येईल आणि वेळ आल्यावर  आणखीन आक्रमक आंदोलन करण्यात येईल, त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही ते म्हणाले.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply