Breaking News

‘आरएसएस’चा वनवासींसोबत दिवाळी फराळ

पनवेल : रामप्रहर वृत्त

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस)वतीने दुंदरेवाडी, तामसईवाडी, करंजाडे येथील फणसवाडी आणि भोंगळपाडा या वनवासी वस्त्यांवर रविवारी (दि. 15) दिवाळीनिमित्त वनवासी बांधवांबरोबर दिवाळी फराळ करण्यात आला. या वेळी पनवेलमधील तरुण मुले-मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळी साडेनऊच्या सुमारास या वाड्यांवर स्वयंसेवक पोहचले. एक देशभक्तीपर गीत त्यांच्या समवेत गाण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्याशी छोटासा गप्पांचा कार्यक्रमही करण्यात आला. या वेळी त्यांचे जीवन व त्यांच्या जीवनाची माहिती इतर तरुणांना करून देण्यात आली. या वेळी बाल स्वयंसेवकसुद्धा उपस्थित होते. या वनवासी वाटांवर असलेल्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न स्वयंसेवकांनी केला तसेच पुढील काही दिवसांत त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही देण्यात आले. या वेळी कुणाल  मानकामे, पुष्कर सहस्त्रबुद्धे, शुभम शेटे, अमोल साखरे, सुरेंद्र गाडगीळ, आशिष करमाकर आदी स्वयंसेवक उपस्थित होते.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply