Sunday , October 1 2023
Breaking News

वंदे मातरम संघटनेचा रिक्षा थांबा

पनवेल : रामप्रहर  वृत्त

भारतीय जनता पार्टी पुरस्कृत वंदे मातरम जनरल कामगार संघटनेअंतर्गत स्थानिक प्रकल्प चालक-मालक संघटनेचा पंचमुखी हनुमान मंदिराजवळ रिक्षा थांबा सुरू करण्यात आला आहे. या रिक्षा थांब्याच्या नामफलकाचे उद्घाटन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. या थांब्यावरून पनवेल तक्का ते शिरढोण आणि शेडूंग या मार्गावर शेअर रिक्षा प्रवास करणार आहेत.

हा थांबा सुरू झाल्याने शिरढोण आणि शेडूंग मार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या थांब्याच्या नामफलकाचे उद्घाटन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या वेळी भाजपचे तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल महापालिकेचे नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवि नाईक, महेंद्र गोजे, स्थानिक प्रकल्प चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ खारके, उपाध्यक्ष धीरज कांबळे, सल्ल्गार रवी पाटील, प्रदीप पाटील, राकेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. या वेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत आणि तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply