Monday , October 2 2023
Breaking News

क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्याने तरुणाची आत्महत्या

आईनेही संपवली जीवनयात्रा

नागपूर : प्रतिनिधी
सट्टेबाजीच्या कर्जामुळे तणावात असलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने आईनेही विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. मायलेकाच्या आत्महत्येच्या घटनेमुळे उपराजधानी हादरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. खितेन नरेश वाघवानी आणि दिव्या वाघवानी असे मृत मायलेकांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील  मसाले व्यावसायिक नरेश वाघवानी यांचा मुलगा खितेन हा शिक्षण घेत वडिलांना मसाला विक्रीत मदत करीत होता, मात्र तो चुकीच्या संगतीत लागला व त्याला क्रिकेट सट्टेबाजीच्या जुगाराची व्यसन लागले. मागील वर्षी तो सट्ट्यात काही लाख रुपये हारला होता. ही बाब त्याने कुटुंबीयांना सांगितली व त्याचे वडील ते पैसे हळूहळू देत होते. खितेनने यंदा परत मित्रांच्या सांगण्यावरून आयपीएलच्या सामन्यांवर पैसे लावले, मात्र गेल्या महिन्याभरात तो जवळपास सहा ते सात लाख रुपये हारला. सट्टेबाज पैशांसाठी त्रास देऊ लागले व यातून खितेन तणावात गेला. घरी कुणीच नसताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
मुलाने आत्महत्या केल्याचे दु:ख त्याची आई दिव्या पचवू शकली नाही. सकाळी मुलावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना दिव्या यांनी विष घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Check Also

 लोकनेते दि.बा.पाटील नामकरण कृती समितीतर्फे सर्व आजी माजी आमदारांची लवकरच बैठक

पनवेल : प्रतिनिधी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात …

Leave a Reply