उरण : वार्ताहर – राज्यात महाविकास आघाडी सरकारने वाढीव वीज बिल संदर्भात कोणतीही सवलत न देता जनतेला संपूर्ण बिले भरण्याबाबत आदेश काढले आहेत. या नाकर्त्या राज्य सरकारविरोधात वाढीव वीज बिलांची होळी करून प्रखर राज्यव्यापी आंदोलन सोमवारी (दि. 23) करण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून उरण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली उरण शहरातील गणपती चौक येथे वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली.
या वेळी उरण तालुका भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, महालन विभाग अध्यक्ष महेश कडू, नगरसेविका जानव्ही पंडीत, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेवक धनंजय कडवे, शहर महिला अध्यक्षा संपूर्णा थळी, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, तालुका युवा अध्यक्ष शेखर पाटील, शेखर तांडेल, जिल्हा उपाध्यक्ष नीलकंठ घरत, तालुका उपाध्यक्ष शशी पाटील, मिलिंद पाटील, जसिम गॅस, हितेश शाह, मनन पटेल, माजी नगरसेवक राजेश कोळी, हस्तीमल मेहता, मनोहर सहतिया, स्वप्नील कासारे, मदन कोळी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना काळात नागरिकांना आलेल्या वाढीव वीज बिलविरोधात भाजप कामोठे मंडलतर्फे आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालय सेक्टर 36 कामोठे येथे वीज बिलांची होळी करून निषेध करण्यात आला.
या वेळी भाजप कामोठे मंडल अध्यक्ष रविशेठ जोशी, महामंत्री सुशीलकुमार शर्मा, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेवक विकास घरत, नगरसेविका कुसुम म्हात्रे, युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, सुनीता शर्मा, वनिता मॅडम, युवा मोर्चा सरचिटणीस नवनाथ भोसले, उपाध्यक्ष तेजस जाधव, मयंक कुमार, धनाजी शेठ, संजय पाटील, किरण जाधव आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.