Breaking News

मॉर्निंग वॉकला जाणार्या गृहस्थाचा अपघाती मृत्यू

संतप्त ग्रामस्थांचा जासईत रास्ता रोको

उरण : प्रतिनिधी, वार्ताहर – उरण तालुक्यातील जासई-चिर्ले रोडवरून मॉर्निंग वॉकला जात असताना येथील गृहस्थ दत्तात्रेय जनार्दन ठाकूर (56) यांना अज्ञात वाहनाने रविवारी

(दि. 22) सकाळी धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तीन तास रास्ता रोको आंदोलन केले.

दरम्यान, हे आंदोलन सुरू असतानाच उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जगदिश कुलकर्णी आणि सहाय्यक निरीक्षक व्ही. जी. कावळे यांनी संबंधित अपघात वाहन शोधून कारवाई करून मयत कुटुंबीयांना मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले.

या वेळी संतप्त नागरिकांच्या वतीने दिघोडे दास्तान मार्गावरील अवजड वाहनांना बंदी करावी, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनासाठी ग्रामस्थ मंडळ संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, गाव आघाडीचे अध्यक्ष यशवंत घरत, इंटकचे संजय ठाकूर, माजी सभापती नरेश घरत, सरपंच संतोष घरत, धर्मा पाटील, जासई भाजपचे अध्यक्ष मेघनाथ म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य योगिता म्हात्रे, कामगार नेते दत्ता घरत, अमृत ठाकूर, आदित्य घरत, गणेश पाटील, विवेक म्हात्रे, रघुनाथ म्हात्रे, गोपीनाथ म्हात्रे, ठाकूर कुटुंबीय तसेच  ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply