Breaking News

सिडकोच्या मुख्य दक्षता अधिकारीपदी निसार तांबोळी

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त  : भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी निसार तांबोळी यांनी दिनांक 27 मे, 2019 रोजी सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली. सध्याचे प्रभारी मुख्य दक्षता अधिकारी अशोक शिनगारे यांच्याकडून त्यांना मुख्य दक्षता आयुक्तपदाचा पदभार सोपविण्यात आला.

निसार तांबोळी हे सन 2005च्या तुकडीतील महाराष्ट्र कॅडरचे भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी निसार तांबोळी हे राज्य गुप्तवार्ता विभागात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत होते.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply