पनवेल : रामप्रहर वृत्त – भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसानिमित्त निलेश अरुणशेठ भगत यांच्याकडून नेरे पाडा येथील स्नेहकुंज वृद्धाश्रम येथे वॉटर डिस्पेन्सर मशीन आणि युवा नेते दशरथ म्हात्रे व भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल तालुका (ग्रामीण) यांच्या वतीने भानघर येथील करूणेश्वर वृद्धाश्रम येथे वॉशिंग मशीन व रेशन धान्य भेट देण्यात आले.
या वेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, दशरथ म्हात्रे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेरकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, युवा मोर्चाचे दिनेश खानावकर, विश्वजीत पाटील, आशिष कडू, अभिषेक भोपी, हर्षवर्धन पाटील, सुनील पाटील, अंकुश पाटील, मयूर कदम, सुनील शेळके उपस्थित होते.
