Breaking News

‘रोटरी’तर्फे दिव्यांगांसाठी मार्गदर्शन चर्चासत्र

पेण : रामप्रहर वृत्त

जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ पेणने आई डे केअर संस्था संचलीत मतिमंद मुलांसाठी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र पेण येथील दिव्यांग विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन केले होते.

या चर्चेसाठी पेणमधील सुप्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.सोनाली वनगे या उपस्थित होत्या. या कार्यक्रमांतर्गत त्यांनी लर्निंग डिसेबिलिटी आणि डाऊन सिंड्रोम या विषयावर पालकांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी अपंग बालक का जन्माला येते. क्रोमोसोम 21 याला कारणीभूत कसा ठरतो, असे बालक जन्माला येऊ नये याकरिता घ्यावयाची काळजी तसेच जर असे बालक जन्माला आलेच, तर पालकांनी जागरूक राहून मानसिक रित्या खंबीर राहून तसेच कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता बालकाला योग्य प्रशिक्षणद्वारे कसे वाढवता येते जसे विशेष शिक्षण फिजिओथेरपी स्पीच थेरपी यामुळेच मुलांची प्रगती चांगली होते यावर उत्तम मार्गदर्शन केले

त्यानंतर प्रश्नोत्तराद्वारे पालकांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमात रोटरी क्लब ऑफ पेण तर्फे विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला रोटरी क्लबच्या अध्यक्ष संयोगिता टेमघरे, सचिव जयेश शहा, आई डे केअरच्या  कार्याध्यक्षा स्वाती मोहिते, फिजिओथेरपिस्ट अमलू विल्सन, शिक्षक वर्ग पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निशा पाटील आणि आभार प्रदर्शन विशेष शिक्षिका शिल्पा पाटील यांनी केले. असे आई केअरच्या अध्यक्ष प्रेमलता रुपेश पाटील यांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply